रत्नागिरी:- रुमचा दरवाजा सावकाश बंद करा दरवाजा तुटून नुकसान झाले तर भरुन कोण देणार असे पतीला सांगितल्याच्या रागातून पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच मुलीला लाकडी स्टूलने मारहाण केली. या प्रकरणी पतीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन संभाजी सावंत (वय ३८, रा. जाकिमिऱ्या मुळ: खालचा फगरवठार परटवणे, सावंतनगर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास जाकिमिऱ्या येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास पती सचिन सावंत यांना रुमचा दरवाजा सावकाश बंद करा, दरवाजा तुटून नुकसान झाले तर भरुन कोण देणार आहे असे पत्नी सांगितले. याचा राग मनात धरुन पतीने पत्नीला मारहाण केली तर मुलीला लाकडी स्टुलने मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी स्मिता सचिन सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









