रत्नागिरी:- जैतापूरहून रत्नागिरीकडे येणाऱ्या रिक्षाला गोळप चढावात टेम्पोची धडक लागून अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना रविवारी (ता. २४) सकाळी साडेसातच्या सुमारास गोळप-चढावात घडली.
पोलिसाकंडून मिळालेल्या माहितीनुसार राज अशोक कदम (वय २५, रा. शिळ, कदमवाडी, रत्नागिरी) हे आज सकाळी जैतापूरहून रत्नागिरीकडे येत होते. गोळप चढावात आल्यानंतर रत्नागिरीहून जाणाऱ्या टेम्पोने रिक्षाला समोरुन धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक राज कदम यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.









