गोखले नाका येथील मटका जुगारावर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- शहरातील गोखले नाका-आगाशे कन्या शाळेजवळ मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ७८०रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर वसंत पिलणकर (वय ६४, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास गोखले नाका, आगाशे कन्या शाळेजवळ घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित हे विनापरवाना मटका जुगार चालवत असताना सापडले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार शांताराम झोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.