गैरसमजातून झाला मारुती मंदिर येथे बार बाहेर हल्ला

रत्नागिरी:-गैरसमजातून तरुणाच्या डोक्यात बीअरची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वा.मारुती मंदिर येथील एका बीअर बार बाहेर घडली.

कमलेश संतोष कदम (रा. शांतीनगर, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात शंकर धोंडू तारवे (47,रा.उद्यमनगर, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,शुक्रवारी सायंकाळी शंकर आणि त्याचा मित्र आशिष हे दोघे मारुती मंदिर येथील बीअर बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते.

तेव्हा कमलेशने तिथे येऊन दोघांनाही बाहेर बोलावले.शंकर आणि आशिष बार बाहेर आल्यावर ते दोघे माझ्याच बाबतीत बोलत असल्याचा गैरसमज करून घेत बीअरची बाटली शंकरच्या डोक्यात आणि डाव्या हातावर मारून दुखापत केली.याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण कोकरे करत आहेत.