गुहागर:- गुहागर-चिपळूण या मुख्य मार्गावरील चिखली येथे शुकवारी सकाळी 9.45 च्या सुमारास टाटा ट्रक व दुचाकी यांयात अपघात होऊन यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी पुढे नेण्यात आले आहे.
या घटनेची खबर ट्रकचालक समीर दत्तात्रय खेडेकर (49, माखजन-संगमेश्वर) यांनी दिली. यामध्ये ते आपल्या मालकीच्या टाटा ट्रकमध्ये अल्ट्राटेक सिंमेंट भरून ते रत्नागिरी- निवळी- गुहागर असा प्रवास करत होते. शुकवारी सकाळी 9.45च्या सुमारास गुहागर-विजापूर रोडवर चिखली येथे दुचाकीस्वार बाशीद अलीअय्याज माहीमकर (29, गुहागर) हा चुकीच्या बाजूला येवून ट्रकसमोरील बाजूस आदळून गंभीर जखमी झाला. या घटनेची नोंद येथील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.









