गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात दापोली पोलिसांकडून आरोपीला बेड्या

रत्नागिरी:- दापोली पोलिसांच्या यशामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. शिवाय चोरीस गेलेला मुद्देमाल मुंबई येथून हस्तगत करण्यात आला आहे.

दापोली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर असलेला आरोपी तुषार प्रकाश सुर्वे यास गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 2 तासाच्या आत पोलीस अधीक्षक रत्नागिरी व उप विभागीय पोलीस अधिकारी खेड यांचे मार्गदर्शनानुसार अधिक तपास करीत आरोपीस अटक करण्यात आली. सदर गुन्ह्यातील फिर्यादी महिला रंजना शिंदे, रा. शिरखल ता.दापोली याना 40 वर्षांपूर्वी त्यांच्या आईने लग्नामध्ये सोन्याचे दागिने भेट स्वरूपात दिलेले होते. सदरचे दागिने दापोली पोलिसांनी अत्यंत शिताफिने मुंबई मालाड येथून ताब्यात घेतले गुन्ह्याचा तपास करून मुद्देमाल हस्तगत केल्याने पालघड दुरक्षेत्र हद्दीतील ग्रामस्थांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दापोली यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनानुसार पोऊनी राजकुमार यादव, पो.हवा. अशोक गायकवाड,पो.हवा. अभिजित पवार, पो.ना. राजेंद्र नलावडे, पो.कॉ. विकास पवार, सुहास पाटील यांनी केला आहे.गुन्ह्याचा तपास उत्कृष्टपणे करून पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचे काम केल्याने पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी दापोली पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे