Saturday, June 27, 2026
spot_img
Home दापोली गिम्हवणेत विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू

गिम्हवणेत विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू

दापोली:- तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे विहिरीत पडून प्रीशा सुदेश वाडकर हिचा मृत्यू झाल्याची घटना रविवार ५ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता उघडकीस आली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीशा वाडकर (२८ सध्या रा. गिम्हवणे उगवतवाडी) ही मागील २ वर्षांपासून माहेरी तिची आई प्रतिभा मोरे यांच्यासोबत राहत होती.

प्रतिभा मोरे या ७ दिवसांपूर्वी त्यांच्या सुनेच्या प्रसूतीकरिता मुंबई येथे गेल्या होत्या. ५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास. निखिल जाडे याला याबाबत समजल्यानंतर त्याने फोन करून प्रीशा हिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर तिला नातेवाईकांनी रुग्णवाहिकेने तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असंता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दापोली पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.