खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी येथील कारमधून २ किलो गांजाच्या वाहतूकरणी एकास येथील पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी रवींद्र दत्ताराम खळे (३८, रा. वालोपे, चिपळूण) यालाही पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाच “दिवसांपूर्वीच कारमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या रवींद्र सहदेव जाधव (४५, डा. सिद्धार्थनगर- घाटकोपर, मुंबई) याला पाठलाग करत शिताफीने गजाआड केले होते. त्याच्याकडून २७ हजार रुपयांचा गांजा, ५ लाखाची मोटार आणि अन्य साहित्य असा ५ लाख ४४ हजार २१२ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला होता. तपासात आणखी एकाचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी जप्त केलेला गांजा रवींद्र जाधव याने चिपळूण तालुक्यातील वालोपे वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या रवींद्र खळे याच्याकडून आणल्याची कबुली दिली होती. त्यानुसार रवींद्र खळेला पोलिसांनी अटक केली.