Monday, May 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या उद्यमनगर येथील तरुणाचा मृत्यू

गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या उद्यमनगर येथील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- अज्ञात कारणातून गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान 18 डिसेंबर रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.

दिपक बाबू माने (30, रा. पटवर्धनवाडी उद्यमनगर, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिपक माने याने बुधवार 10 डिसेंबर रोजी अज्ञात कारणातून राहत्या घ्ारी गवत मारण्याचे औषध प्राशन केले होते. काही वेळाने त्याला अस्वस्थ्ा वाटू लागल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करुन त्यानंतर दिपकला अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान,17 डिसेंबर रोजी दिपकला पुन्हा जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारांदरम्यान गुरुवारी दुपारी दिपकचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.