रत्नागिरी:- गणपतीपुळे मानेवाडी येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संदिप रावणंग असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप रावणंग हे त्यांच्या राहत्या घरी एकटेच होते. घराचे दोन्ही दरवाजे आणि खिडक्या बंद करून त्यांनी आतील खोलीतील माळ्याच्या वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. ही घटना २६ एप्रिल रोजी रात्री ९.१५ वाजता उघडकीस आली.
या घटनेची जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.