Friday, May 1, 2026
spot_img
Home चिपळूण खेर्डी येथे अपघातात आर्किटेक्टचा मृत्यू

खेर्डी येथे अपघातात आर्किटेक्टचा मृत्यू

चिपळूण:- खेर्डी येथे ट्रक पायावरून गेल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आर्किटेक्टचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीर चंद्रकांत चिवेलकर (वय. ३३) असे त्या आर्किटेक्टचे नाव आहे. शनिवारी रात्री चिपळूण – कराड मार्गावर खेर्डी येथे रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार समीर चिवेलकर हा आपल्या दुचाकीवरून खेर्डी-शिगवणवाडी येथे दुचाकीवरून जात होता. रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला चिवेलकर याच्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात चिवेलकर हे खाली पडले. त्यानंतर समोरून आलेला ट्रक चिवेलकर याच्या पायावरून गेला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.. उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा असा परिवार आहे.