खेडमध्ये डोक्यात वार करून पतीने केला पत्नीचा खून

खेड:- खेड तालुक्यातील भेलसई कुपवाडी येथे सुमारे ४० वर्षीय पत्नीच्या डोक्यात धारदार वस्तुचा घाव घालून खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीच्या भांडणातून पतीने पत्नीच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये पत्नीचा जागीच अंत झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सुजित गडदे, मंगेश शिवगण, सत्यवान मयेकर हे कर्मचारी रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत तपास सुरु होता.