खेडमध्ये काकाकडून पुतणीच्या दीड लाखांच्या मंगळसूत्राची चोरी

खेड:- मानस काकानेच पुतणीचे मंगळसूत्र चोरल्याची घटना तालुक्यातील घाणेखुंट येथे घडली. याबाबतची फिर्याद सुलभा नरेश कासार (30,रा. मालाड-मुंबई, मूळगाव कुडावळे-दापोली) यांनी पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार मानस काका किशोर दत्तू रिकामे (40) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलभा या 13 मार्च रोजी मानस काका किशोर रिकामे यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी निळ्या रंगाच्या पर्समध्ये ठेवलेले 5 तोळ्याचे 1 लाख 64 हजार 500 रूपये किंमतीचे मंगळसूत्र चोरीस गेले. मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात येताच सुलभा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित मानस काका किशोर दत्तू रिकामे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.