Sunday, June 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी खेड येथे सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी

खेड येथे सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी

खेड:- खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे एका सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कपाटात ठेवलेली १५ हजार रुपयांची रोकड लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन अनाजी मोरे (वय ५०, रा. घाटकोपर, मूळ रा. वडगाव बुद्रुक) हे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून मुंबईत कार्यरत आहेत. १९ एप्रिल रोजी दुपारी १ ते २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० या कालावधीत ही चोरीची घटना घडली. संशयित आरोपी गजानन तानाजी तांबे (वय ४२, रा. मालवणी, मालाड, मुंबई) याने फिर्यादीच्या वडगाव बुद्रुक येथील घराचा ताबा घेत, घरातील कपाटात ठेवलेली १५,००० रुपयांची रोकड फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली.

या प्रकरणी सचिन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, खेड पोलिसांनी आरोपी गजानन तानाजी तांबे याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि भा.द.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.