खेड:- खेड येथे मदीना चौकात वॅगेनर आणि दुचाकीवरुन पाच जणांनी येवून भोस्ते येथील तरुणास बेदम मारहाण केली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री ८:३० ते ९ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील भोस्ते जसनाईक मोहल्ला येथील इब्राहिम मुराद अली लाडघरकर (वय २४) हा मित्राच्या सोबत डाकबंगला येथील टपरीसमोर मजामस्ती करीत होता. दोघे बोलताना इमाद कोंडविलकर आणि सैफ चौगुले या दोघांनी तिथं येवून धक्काबुक्की केली. तसेच हाताने मारहाण करीत ‘थांब तुला दाखवतो, मुला आपवतो’, अशी धमकी दिली. यानंतर तो घरी जायला निघाला तेव्हा तो शहरातील मदीना चौक येथे पोचला. त्यावेळी मुतशीर उर्फ बबलू कोंडविकर याने फोन करुन तरुणाला ‘कुठे आहेस’, असे विचारले. तेव्हा तो रस्त्यावर भेटलेल्या भावाकडे बोलत मदीना चौक येथे असल्याचे सांगितले.
यानंतर काही वेळातच वॅगेनर व दुचाकी घेऊन आलेल्या इमाद कोंडविलकर (१६), सैफ चौगले (१८), मुतशीर उर्फ बबलू कोंडविकर (३५), मुझम्मील कोंडविलकर (३०) आणि रियाज परकार (२८ सर्व रा. डाकबंगला, खेड) या पाच जणांनी इब्राहिमला बेदम मारहाण केली. हा प्रकार पाहिल्यावर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी त्याची सुटका केली. या प्रकारानंतर त्या पाचही जणांनी तेथून पळ काढला. त्यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बेकायदा जमाव करुन मारहाण केल्याचा भादवि कलम १४३, १४९, ३२३ व ५०६ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यातील मुतशीर उर्फ बबलू कोंडविकर, मुझम्मील कोंडविलकर आणि रियाज परकार या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. तर अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.