Thursday, May 14, 2026
spot_img
Home गुहागर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा खाडीत बुडून मृत्यू

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा खाडीत बुडून मृत्यू

गुहागर पांगारी येथील घटना

गुहागर:- तालुक्यातील पांगारी तर्फे हवेली भुरकुंडा येथे खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. असलम अब्दुल करीम दळवी असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, असलम अब्दुल करीम दळवी (वय ५६, रा. पांगारी तर्फे हवेली भुरकुंडा, ता. गुहागर) हे शुक्रवारी, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास गावाजवळील खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. शोधाशोध केली असता, त्यांचा मृतदेह खाडीच्या पाण्यात आढळून आला.

​मयत असलम दळवी हे दारूच्या नशेत असताना खेकडे पकडण्यासाठी गेले होते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी ६:०० ते सायंकाळी ६:०० या दरम्यान ते खाडीच्या पात्रात पडले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.