रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे बेशुद्धावस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार पालिकेचे कर्मचारी प्रथमेश दिपक भोसले हे प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे क्रिडांगणाची साफसफाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना बेशुद्ध अवस्थेत अनोळखी वय अंदाजे ४५, आढळला. तात्काळ त्यांनी या बाबत शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिकांच्या मदतीने त्या अनोळखीला रुग्णवाहिकेने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून अनोळखीला मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.