रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या संपर्क क्रांती मडगाव एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ३८ हजाराचा मोबाईल अज्ञात चोरट्याने पळविला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १३) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पंकज रतिलाल पटेल हे कोकण रेल्वेच्या संपर्क क्रांती मडगाव एक्स्प्रेसने प्रवास करत असताना चोरट्याने त्यांचा ३८ हजाराचा मोबाईल पळविला. या प्रकरणी पटेल यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.