रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन ते रेल्वे फाटा असा जाणाऱ्या वृद्ध पादचाऱ्याला रिक्षाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. संशयित रिक्षा चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश केरु मोहिते (रा. शिळ, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वेस्टेशन ते रेल्वेफाटा दरम्यान घडली.
पोलिसांनीकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे चुलत सासरे चंद्रकांत राजाराम सुर्वे (वय ६६ मुळ रा. तुळसणी, ता. संगमेश्वर, मुळ ः एल. बी. एस मार्ग मंगत्राम पेट्रोलपंप भांडूप वेस्ट मुंबई) हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे चालत जात असताना रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ०७७४) वरिल संशयित चालक राजेश मोहिते याने चंद्रकांत सुर्वे यांना धडक दिली. या अपघातात सुर्वे यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुखापतीस व मरणास कारणीभूत झालेल्या रिक्षा चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.