चिपळूण:- तालुक्यातील कापसाळ येथे शेताचे बांध घालण्यावरून दोघांच्यात शाब्दिक चकमक उडून एका अपंग व्यक्तीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश विठ्ठल खेडेकर (वय ४१) हे कापसाळ पायरवाडी येथे राहतात. त्यांची स्वतःची पान टपरी आहे. पायरवाडी येथील गजानन खेडेकर यांच्या घराशेजारील शेतामध्ये रवींद्र काशिनाथ खेडेकर आणि गणेश खेडेकर यांच्यामध्ये २४ फेब्रुवारीला दुपारी शाब्दिक चकमक उडाली. गणेश खेडेकर हे अपंग आहेत. तरीही रवींद्र खेडेकर यांनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यांना खाली पाडून लोखंडी पाईपने पायावर मारहाण केली. याप्रकरणी गणेश खेडेकर यांनी रवींद्र खेडेकर यांच्या विरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.