रत्नागिरी:- शहरातील धनजी नाका येथे किरकोळ करणातून तरुणाने महिलेवर सुरीने वार केले.ही घटना रविवार 29 मे रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास घडली.
मुजम्मील अजीज पडवेकर (रा. धनजी नाका, रत्नागिरी ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.रविवारी सायंकाळी 5 वा. सुमारास मुजम्मीलची आई अंजुम पडवेकर आणि त्या महिलेमधे कोणत्यातरी कारणावरून वाद सुरु होता. तेव्हा मुजम्मील सूरी घेऊन तिथे आला आणि त्याने त्या महिलेच्या चेहऱ्यावर उजव्या बाजूला वार केला.अधिक तपास पोलीस नाईक पाटील करत आहेत.