काळबादेवी नवानगर येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक

रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी नवानगर येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. काळबादेवी नवानगर येथील वळणावर चालकांना अंदाज न आल्याने तसेच पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने रस्ता निसरडा झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यातील एक बस शहरी असून ती रत्नागिरीच्या दिशेने जात होती तर दुसरी बस ग्रामीण विभागाची असून ती गणपतीपुळेच्या दिशेने जात होती. या अपघातात दोन्ही बसच्या चालकांना किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही बसमधील प्रवासी सुखरूप आहेत.