रत्नागिरी:- तालुक्यातील कापडगाव येथील एका कंपनीच्या मेसमध्ये जेवण मागितल्याच्या रागातून फिर्यादी आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य काही जणांना 14 जणांनी लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवार 26 जानेवारी रोजी रात्री 8.15 वा.सुमारास घडली आहे.
याप्रकरणी 14 अज्ञातांविरोधा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात नवाब खान बाबाजान पठाण (42, रा. निपाणी बेळगाव, कर्नाटक) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 26 जानेवारी रोजी ते कापडगाव येथील इंद्रदिप इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीतील मेसमध्ये अन्य बल्गर चालकांसोबत जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे काम करणार्या दोघांनी त्यांना आम्ही बाहेरच्या लोकांना जेवण देत नाही असे सांगत जेवण देण्यास नकार दिला. त्यावेळी नवाब पठाण आणि इतर चालकांनी त्यांना जेवण देण्याची विनंती केली. त्या रागातून तेथील दोन्ही कामगारांनी त्यांना शिवीगाळ करत बाहेर जाण्यास सांगितले.
दरम्यान,फिर्यादी पठाण आणि अन्य बल्गर चालक
मेसमधून बाहेर येउन कंपनीच्या आवारातील स्टोअरजवळ थांबले असताना मेसमधील ते दोन्ही कामगार कंपनीच्या अन्य 12 कामगारांसह तिथे आले.त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या सोबत असलेल्य बल्गर चालकांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली.याप्रकरणी संशयित 14 जणांविरोधात भादंवि कायदा कलम 143, 147, 149, 325, 323,504,506 महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1),(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









