रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कशेळी समुद्रकिनारी कुसगे येथे एका २८ वर्षीय तरुणाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रतिक तुकाराम आंबेरकर ( २८ वर्षे, रा. कशेळी तेलीवाडी) असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिक आंबेरकर हा ११ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता घरातून कोणाला काही न सांगता निघून गेला होता. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. अखेर शनिवार १२ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता कशेळी समुद्रकिनारी कुसगे येथे ते समुद्राच्या पाण्यात मृत अवस्थेत आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नाटे पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रतिकच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.









