Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी एमआयडीसी येथील आणखी एका वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

रत्नागिरी एमआयडीसी येथील आणखी एका वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी येथील वैश्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (1956) एका नेपाळी महिलेला अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली असून, दोन महिलांची या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला एमआयडीसी, रत्नागिरी येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक बनावट ग्राहक (डमी) पाठवून प्लॉट ई-69, मिरजोळे एमआयडीसी येथे छापा टाकला.
छाप्यादरम्यान, एका नेपाळी महिलेकडून पुण्यातील दोन महिला देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

ही कारवाई रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या पथकात सपोनि. श्रीमती शबनम मुजावर, श्रेणी पोउनि. संदीप ओगले, पोहेकॉ. विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, मपोहेकॉ. स्वाती राणे, शितल कांबळे, मपोकॉ पाटील आणि पोना दत्ता कांबळे यांचा समावेश होता.