Sunday, September 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी कर्ला येथे न्यायालयाने सिल केलेल्या घरात प्रवेश करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा

कर्ला येथे न्यायालयाने सिल केलेल्या घरात प्रवेश करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या जुवे ग्रामपंचायत कर्ला येथे कोर्ट कमिशनर यांनी सील केलेल्या आणि फिर्यादी यांच्या ताब्यात दिलेल्या प्रॉपर्टीमध्ये अनधिकृत प्रवेश केल्या प्रकरणी संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिगंबर शंकर किर (रा. जुवे, ग्रामपंचायत कर्ला, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १ ते ७ जुलै या कालावधीत दुपारी साडेतीनच्या सुमारास जुवे-ग्रामपंचायत कर्ला येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या फिर्यादी राजीवकुमार श्रीबिश्वेश्वर प्रसाद (वय ५१, रा. बॅंक ऑफ इंडिया झोनल ऑफिसर कॉर्टर्स-बी ९ शिवाजीनगर, रत्नागिरी. मुळ ः गिरीडीह एमआरएफ शोरुम समोर मोहनपूर ता. जि. गिरीडीह) यांना १ जुलै ला कोर्ट कमिशनर यांनी प्रॉपर्टी सिल करुन त्यांच्या ताब्यात दिली होती. संशयित दिगंबर कीर यांनी हिस्सा क्रमांक ११,१२, १३, २० व त्यावरील कर्ला ग्रामपंचायत घर क्र. ८३० ही मालमत्ता यावर बेकायदेशिर प्रवेश करुन त्यांच्या कुटुंबिया समवेत रहात आहेत. या प्रकरणी राजीवकुमार प्रसाद यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गृहअतिक्रमण करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.