Friday, August 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी करबुडे येथील अल्पवयीन मुलाचा पोटदुखीने मृत्यू

करबुडे येथील अल्पवयीन मुलाचा पोटदुखीने मृत्यू

रत्नागिरी:- करबुडे येथील अल्पवयीन मुलाच्या पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. गुरुराज भाऊ मोहिते (वय ८, मु.पो. करबुडे, रत्नागिरी) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ६) मध्यरात्री सीपीआर कोल्हापूर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुराज मोहिते या मुलाच्या २९ जुलैला अचानक पोटात दुखू लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथून खासगी हॉस्पीटल येथे दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापुर येथे दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.