रत्नागिरी:- तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे सुख सोईबरोबर काही तोटे देखील होत आहेत. जिह्यात मागील 6 महिन्यात सायबरचे 134 गुन्हे दाखल झाले आहेत़. यात ऑनलाईन गंडा, कमी व्याजदरात कर्ज, बक्षिस आदी बतावणी करून लाखोंचा चूना लावला जात आह़े.
प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्ट फोन आल्याने फेसबुक, वॉटसऍप, इन्स्टाग्राम आदी सोशल साईड्सचा वापर वाढला आह़े. याच गोष्टीचा फायदा फसवणूक करण्यासाठी हेत आह़े. दोन वर्षापूर्वी रत्नागिरीचे तत्कानील पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होत़े. याप्रकरणी अद्याप संशयित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाह़ी. यातून अशा गुह्यात पोलिसांसमोरील आव्हानाची कल्पना येते. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट फेसबुक पोफाईल तयार करून आयएएस अधिकारी असल्याचा बनाव देखील समोर आला होत़ा. दरम्यान या संशयिताने आएएस अधिकारी असल्याचे सांगून एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीशी लग्न केल्याचेही समोर आले होत़े.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ड़ॉ ब़ी एन पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा धक्कादायक पकार समोर आला होत़ा. यासंदर्भात समाज माध्यमांचा काळजीपूर्वक व सावधगिरी बाळगून वापर करा, अमिषाला बळी पडू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत़े मात्र याकडे नागरिक अपेक्षित गांभिर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.