एसटी अपघातातील ‘त्या’ चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- एसटी वृद्ध प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू कोंड्या आखाडे (वय ५५) असे संशयित एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी अडीचच्या सुमारास एसटी बसस्थानक येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शैलेंद्र कमालाकर चव्हाण (वय ५०) यांचे वडिल कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२) हे मेडीकल मधून आपल्या आजारपणाच्या गोळ्या घेऊन परत घरी जाण्यासाठी एसटी डेपोत जात असताना भाट्ये रस्त्यावरुन डेपोत येणारी बस (क्र. एमएच-१४ बीटी २७५७) वरील संशयित चालक बापू आखाडे यांनी एसटी निष्काळजीपणे चालवून कमलाकर चव्हाण यांना ठोकर दिली. ते खाली पडल्यानंतर त्यांच्या दोन्ही पायावरुन चाक गेले या अपघातामध्ये कमलाकर चव्हाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.