एमआयडीसी येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहराजवळील एमआयडीसी येथे एका कंपनीच्या बाजूला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल गुलाबराव तिवारी (वय ३३, रा. एमआयडीसी-मिरजोळे, रत्नागिरी ) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी ३० जुलैला रात्री पावणे आठच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित राहूल तिवारी हा विनापरवाना हातभट्टीची ९५० रुपयांची ९ लिटर गावठी दारु विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.