रत्नागिरी:- तालुक्यातील बागपाटोळे-तोणदे येथून रत्नागिरीत गुडघ्याचे एक्सरे काढण्यासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २) दुपारी तीनच्या सुमारास चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तरुणी ही तालुक्यातील चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार घेवून गुडघ्याचे एक्सरे काढण्याकरिता एसटीने रत्नागिरीत पण ती परत घरी गेली नाही. घरच्या मित्र-मैत्रीण नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली अद्यापही मिळून आली नाही. या प्रकरणी काजल सुर्वे (वय २२, रा. बागपाटोळे, तोणदे- रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









