संशयित पालिकेचा निवृत्त कर्मचारी; विष देणाऱ्यांचा शोध सुरू
रत्नागिरी:- शहरातील २१ उनाड कुत्र्यांना विष घालून मारल्याप्रकरणी एका संशयिताला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले आहे. शहर पोलिसांनी ही कारवाई केली. यामुळे या प्रकरणाशी संबंधित अनेक धागे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
शहरामध्ये काही दिवसांपूर्वी अचानक एकापाठोपाठ एक अशा 21 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. शहरातील वरच्या पट्ट्यामध्ये हा सर्व प्रकार घडला होता. याप्रकरणी प्राणी मित्रांनी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती .
तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा नोंदविला होता. शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तपासाला गती दिली. चिकन आणि भातामध्ये विष मिसळून ते कुत्र्यांना घातले होते. ज्या भागांमध्ये हा प्रकार घडला त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यामध्ये काही संशयित कैद झाले होते. त्याचा आधार घेऊन संशयितांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. यामागे कोणत्या राजकीय नेत्याचा हात आहे का, याबाबतही चौकशी होणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी या प्रकारात विशेष लक्ष होते.