रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी-मातोश्री फार्महाऊस येथील नारळाच्या झाडाचे ६ हजार ७५० रुपयांचे २५० नारळांची चोरट्याने चोरी केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रविवारी (ता. ९) पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास उक्षी येथील मातोश्री फार्महाऊस येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश चंद्रकांत जोशी (वय ३९, रा. मातोश्री निवास, उक्षी जोशीवाडी, रत्नागिरी) यांचे उक्षी येथे फार्म हाऊस आहे. चोरट्याने त्यांच्या फार्म हाऊस मधील २० नारळाच्या झाडांचे ६ हजार ७५० रुपयांची २०० ते २५० नारळ चोरुन नेले. या प्रकरणी संदेश जोशी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.