आरटीओ कार्यालयातून ट्रकची चोरी; चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कुवारबाव येथील आरटीओ कार्यालयाच्या बाहेरील मोकळ्या जागेतील कार्यालयाच्या कायदेशिर रखवालीतील ट्रक लांबवल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार, ७ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते सोमवार, १० एप्रिल रोजी सकाळी १० वा. कालावधीत घडली आहे.

जगन्नाथ फेरे (रा. भेकराई नगर हवेली पुणे) असे संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. मोटार वाहन निरीक्षक यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, हा ट्रक ओव्हरलोड असल्यामुळे मोटार वाहन निरीक्षक यांनी मुंबई मोटार वाहन कर अधि. १९८५ चे कलम १२ (ब) व मोटार वाहन कायदा कलम १९८८ चे कलम २०७ अन्वये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी येथील आवारात टकावून ठेवण्यात आलेला होता. परंतु, त्या ट्रकमधील माल दुसर्या वाहनातून घेऊन जाण्याची लेखी परवानगी ट्रक चालक जगन्नाथ फेरेला देण्यात आलेली होती.