रत्नागिरी:- शहरातील आझाद नगर येथील बसस्टॉप येथे वाढदिवस सुरु असताना गर्दी जमलेली बघण्यासाठी गेलेल्या तरुणाला संशयितांनी मारहाण व चाकूने हल्ला करुन दुखापत केली. शहर पोलिस ठाण्यात सहा संशयितांसह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आफताब शहबान बलबले, शादाब बलबले, शहबाद गनी बलबले, साहिल बावानी, नवाज व अरबाज (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी सहा संशयितांची आहेत. तर दहा ते बारा अन्य संशयित. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री पावणे बाराच्या सुमारास शहरातील आझाद नगर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अफताब शहबाज बलबले हे त्यांचा वाढदिवस आझाद नगर बस स्टॉप येथे बॅनर लावून तसेच केक कापून साजरा करत होते. हे पाहून फिर्यादी मोहम्मद शेख समीर काझी (वय २५) यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला लावून काय चालले आहे. ते पाहण्यासाठी गेला होते.
संशयित आफताब बलबले याने फिर्यादी यांना पाहून ‘तुझ्या बापाचा रस्ता आहे का तुझा रस्ता पकडून निघून जा’ असे सांगितले. त्यावर फिर्यादी काझी यांनी त्याला सांगितले की, ‘बापावर जाऊ नकोस कोणाच्या बापाचा रस्ता नाही’ असे बोलले असता या बोलण्याचा राग संशयित अफताब बलबले याला आला. त्याने इतर सहकाऱ्यांना बोलला की ‘माझ्या काकांना यानेच अडकवला व टिप पोलिसांना यानेच दिली. याला आता सोडू नका’ असे बोलून धमकी दिली व अफताब बलबले याने फिर्यादी यांच्या शर्टची कॉलर पकडून त्याने केक कापण्या करता आणलेल्या चाकूने फिर्यादी यांच्या छातीवर दोन ठिकाणी मारुन दुखापत केली. त्याचवेळी शहबाज गनी बलबले उर्फ गडू व साहिल बावानी, शादाब बलबले यांनी तेथील लोखंडी सळी घेऊन फिर्यादी मोहम्मद काझी यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. त्याच्या सोबत असलेल्या सात ते आठ जणांनी फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी हजर असलेले मुकद्दर यांनी फिर्यादी काझी यांची सोडवणूक केली. त्यानंतर फिर्यादी याने त्यांचा भाऊ नायब समीर काझी याला फोन करुन त्यांना मारहाण झाल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी मोहम्मद काझी यांचा भाऊ नायब व आई हे त्या ठिकाणी आले व फिर्यादी यांच्या आईने संशयितांना तुम्ही माझ्या मुलाला एवढे का मारले त्याची चुक काय चुक असेल तरी मला सांगायचे असे बोलले असता संशयित शहबान उर्फ गुडू व आफताब फिर्यादी यांच्या आईच्या अंगावर धावून आले व शिवीगाळ करुन आमच्याकडे मोठेमोठे सुरे आहेत. तुमच्या घरातील लोकांना आम्ही साफ करुन टाकू अशी धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या गळ्यातील चेन व अंगठी व पाकीट गहाळ झाले. या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद शेख समीर काझी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सहा जणांसह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.