आगरनरळ येथे बंद स्थितीतील ट्रकला धडक; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी ते जयगड रस्त्यावर आगरनरळ येथे बंद स्थितीत पार्क करुन ठेवलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रक चालकाने मागून धडक दिली. संशयित ट्रक चालकाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमान सरवल अली (वय २८, रा. गणेशनगर, तुर्भे नाका, पो. सानपाडा. जि. ठाणे) असे संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर आगरनरळ येथील ऐका हॉटेल समोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी उदय मनोहर कुलकर्णी (वय ३८, रा. विनायक निवास, शिवराज ढाब्या मागे कुमठे फाटा, कोरेगाव, जि. सातारा) यानी ट्रक (क्र. टी.एन. ७० एसी ०४५७) हा आगरनरळ रस्त्यावर मनिषा हॉटेल समोर बंद स्थितीत ठेवला होता. संशयित अरमान अली याने ट्रक (क्र. एमएच ४६, बीयु ४३०७) हा निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर निष्काळजीपणे ट्रक चालवून आगरनरळ येथील हॉटेलच्या समोर बंद स्थितीत असलेल्या ट्रक मागून धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी फिर्यादी उदय कुलकर्णी यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.