रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबाघाट येथील वळणावर बेदरकारपणे बोलेरो पिकअप गाडी चालवून समोरुन येणार्या कारला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना मंगळवार 17 नोव्हेंबर रोजी घडली.
महादेव सोमलु राठोड (42,रा.मुरुगवाडा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बोलेरो चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात ओमकार सुशिलकुमार पटेकर (24,रा.पन्हाळा,कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,मंगळवारी पटेकर आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार(एमएच-14-सीएक्स-7059) घेउन कोल्हापूरला जात होते.त्याच सुमारास महादेव राठोड आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच-09-इएम-3092) घेउन कोल्हापूर ते रत्नागिरी असा भरधाव वेगाने येत होता.ही दोन्ही वाहने आंबा घाट येथील कळदर्याच्या पुढील वळणावर आली असता बोलेरोची स्विफ्टला समोरुन उजव्या बाजुला धडक बसून हा अपघात झाला.यात कारमधील शुभांगी पटेकर (54,रा.कोल्हापूर) आणि पेदिका महाडिक (13,रा.पूणे) या दोघी जखमी झाल्या.याप्रकरणी अधिक तपास देवरुख पोलिस करत आहेत.









