Tuesday, October 27, 2026
spot_img
Home संगमेश्वर आंबव येथे दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

आंबव येथे दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

देवरूख:- देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर गंभीर जखमी दुचाकीस्वार तरूणाला तातडीने देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील अधिक उपचारासाठी रत्नागिरी‌ येथे दाखल करण्यात आले आहे.

देवरूख-रत्नागिरी हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच अन्य वाहनांची ये-जा सुरू असते. अशा वर्दळीच्या मार्गावर आंबव येथे दुचाकीचा अपघात झाल्याने वाहनचालकांनी वाहन‌ चालवताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हे. काँ. श्रीकांत जाधव यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. भरधाव वेगात दुचाकी चालल्यामुळे व दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज देवरूख पोलिसांनी वर्तवला आहे.