अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तिघांवार पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील दाभोळ येथील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मित्राशी संबंध ठेवण्यास सांगितले. तसेच तरुणाच्या आजोबाने पीडित मुलीच्या वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजल अहिलेश खळे याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्याला मदत करणारा कौस्तुभ हरावडे आणि सुजलचा आजोबा गोविंद खळे (सर्व रा. मुपो नानटे, ता. दापोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल याची एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री होती. यातून प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. दरम्यान शारीरिक संबंध ठेवून अश्लिल कृत्याचे फोटो त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये काढुन जर यापुढे शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे तर संशयित आरोपी सुजल खळेने आपला मित्र कौस्तुभ हरावडे याच्याशी पीडित मुलीला संबंध ठेवण्यास सांगितले. पीडितेला या गोष्टीला नकार दिला. सुजल तिला वारंवार धमक्या देत होता. या धमक्यांना ती कंटाळली होती. एक दिवस सुजल याचे आजोबा गोविंद खळे यांनी मुलीला आणि तिच्या चुलत्याना मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने या प्रकरणी ठाणे, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय जिल्हा पालघर येथे तक्रार दिली होती. ही तक्रार दापोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीत सुजल अहिलेश खळे याच्याविरुद्ध भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ६४ (१), २ (झ) (ड), ३ (५),३५१ (२) ३५२ सह बालकाचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधि. २०१२ चे कलम ४,६,८,१२, माहीती तंत्रज्ञान अधि. २००० चे कलम ६६ (इ) प्रमाणे दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाचा तपास सपोनि अमोल गोरे करत आहे.