अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

खेड:- अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तालुक्यातील खारी-पालकरवाडी येथील एका २१ वर्षीय तरुणाला येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मंजूर झाला.

त्याला २०२१ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी येथील पोलिसांनी १८ डिसेंबर २०२१ मध्ये अटक केल्यापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. या खटल्यात ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ यज्ञेश कदम यांची संशयितातर्फे नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणी ऑगस्ट २०२३ मध्ये न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.