मीटरमधून वीज चोरणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा

नाचणे येथील घटना

रत्नागिरी:- अपार्टमेंटखाली असलेल्या मीटर मधून वीज चोरणाऱ्या नाचणेनजिकच्या गोविंद अपार्टमेंट, पांडवनगर येथील चौघांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी वीज चोरी केल्याचा आरोप करण्यात आल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.

राजेश शिंदे (रा.गोविंद आपार्टमेंट, शुभांगी होम होम्स अँड डेव्हलपर्स पांडवनगर) यांचा याच आपार्टमेंटमध्ये दुसर्या मजल्याव फ्लॅट  आहे. परंतु ते व्यावसायानिमित्त दुसरीकडे राहतात. फ्लॅटचे वीज बिल जास्त आल्याने त्यांनी याबाबतची तक्रार महावितरणकडे  केली होती. त्यानंतर महावितरणच्या कर्मचार्यांनी मीटरची पाहणी केली. यावेळी  त्यांच्या मीटर मधून चोरून  वीज कनेक्शन घेतल्याचे स्पष्ट झाले होते. आपल्या मिटरमधून नेमकी कोणी वीज घेतली आहे. हे तपासण्यासाठी त्यांनी मेन स्वीच बंद केला. यावेळी  चार  फ्लॅटसह पॅसेजमध्ये लाईट बंद झाले. त्यानंतर त्यांना आपल्या मीटरमधून या  फ्लॅटमध्ये वीज घेतली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
 

त्यांनी बिल्डर वासुदेव कृष्णा लोकेगावकर, उमेश पाटकर, साखरकर, हिरे त्यांच्या विरोधात शहर पोलिस  स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.