रत्नागिरी:- सेल्फी काढताना हेदवी येथे दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली. गुहागर येथे बामणघळ पाहण्यासाठी गेले असता दोघेजण घळीत पडले. बुडालेले दोघे पती-पत्नी असून सेल्फीच्या मोहाने या दोघांचा बळी घेतला.
नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. याच वेळेला समुद्रकिनारी असणाऱ्या बामणघळावरील लाटेशी मौजमजा करत असताना ठाणे येथील पती-पत्नी सेल्फी काढत होते. याचवेळी आलेल्या समुद्राच्या लाटे बरोबर पत्नीचा तोल बामणळलीत गेला आणि पत्नी पडताना पाहून पतीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्याचाही तोल गेला. अशाप्रकारे या दोघांचा बामणळलीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अनंत माणगावकर (वय 36), सूचेना माणगावकर (वय 33 रा . ठाणे) अशी पती-पत्नीची नावे आहेत. त्यांच्याबरोबर आई, मामेभाऊ हे चौघेजण फिरण्यासाठी ठाण्यावरून आले होते.









