केबीसीची लॉटरी लागल्याच्या नावाखाली आणखी एकाला गंडा

रत्नागिरी:- केबीसीतुन 25 लाखांची लॉटरी आणि 96 लाखांची महागडी गाडी बक्षीस म्हणून लागल्याच्या नावाखाली रत्नागिरीतील आणखी एकाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी रेहान मुक्तार भाटकर ( 35, राजीवडा) असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. 11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत संजय सहा, ओम प्रकाश यादव, राणा प्रताप सिंघ, मोहित कुमार पांडे यांनी फोनद्वारे फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 
 

आरोपीत यांनी वेळोवेळी फोन करुन के.बी.सी.कडुन २५,००,००० रुपयांची व्हॉट्सअप लॉटरी लागली आहे. त्यासोबत ९६,००,०००/- रु.चार चाकी गाडी लागली आहे असे सांगुन फिर्यादी यांना पैसे भरण्यास सांगुन फिर्यादी यांनी आरोपी यांच्या खात्यात पैसे भरले परंतु फिर्यादी यांना व्हॉट्सअॅप लॉटरीचे पैसे प्राप्त झाले नाही म्हणुन फिर्यादी यांच्या लक्षात आले की त्यांची फसवणुक झाली आहे म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.