जिल्ह्यात 24 तासांत बावीस कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत बावीस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 8 हजार 343 झाली आहे. खेड तालुक्यातील 75 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या 311 एवढी आहे.

गेल्या 24 तासांत 15 रुग्ण रॅपिड अँटिजेन अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 7 आरटीपिसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. सापडलेल्या 22 रुग्णांमध्ये खेड 2, चिपळूण 10, रत्नागिरी 8, मंडनगड 1 आणि दापोलीतील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता 8 हजार 343 झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत एका मृत्यूची नोंद झाली आहे.  खेड तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू आज झाला. मृतांची एकूण संख्या आता 311 झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर 3.72 टक्के आहे. मृतांची तालुकानिहाय संख्या रत्नागिरी 83, खेड 50, गुहागर 12, दापोली 32, चिपळूण 74, संगमेश्वर 32, लांजा 11, राजापूर 14, मंडणगड 3 अशी आहे

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 242 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधितांचा दर 15.04 टक्के आहे. आज एकूण 43 जण कोरोना मुक्त झाले असून जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर 92.54 टक्के आहे. सध्या 229 रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.