Thursday, November 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी उद्यमनगर येथील खलाशाचा पाण्यात बुडून  मृत्यू

उद्यमनगर येथील खलाशाचा पाण्यात बुडून  मृत्यू

रत्नागिरी:- उद्यमनगर येथील खलाशाचा मृतदेह मिऱ्याबंदर येथे आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. साकीब मेहबूब काझी (वय ४९, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १८) दुपारी मिऱ्याबंदर येथील खाडी किनारी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साकिब काझी हा कासारवेली येथील बोट मालकाकडे कामाला गेला होतो. त्याला मद्याचे व्यसन होते. मंगळवारी (ता. १७) साडेदहाच्या सुमारास बोटीवरिल इतर खलाशांसह तो बोटीवरच होतो. पहाटे साडेचार च्या सुमारास तो बोटीवर दिसून आला नाही. तात्काळ इतर खलाशांनी मालकाला समज दिली. बोट मालकाने तात्काळ या बाबत साकीब याच्याघऱी कळविले. की साकीब बोटीवरुन निघून गेला आहे. त्यानंतर त्याची शोधाशोध केली असता तो मिऱ्या येथे मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी तेथे जावून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.