Thursday, November 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी भरधाव कारच्या धडकेत ५९ वर्षीय पादचारी गंभीर जखमी

भरधाव कारच्या धडकेत ५९ वर्षीय पादचारी गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा, धनजीनाका उतार येथे भरधाव वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचाऱ्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. संशयित चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश गोविंद पंडित (वय ५९, रा. पोचरी, माईंगडेवाडी, ता. संगमेश्वर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना ८ सप्टेंबर २०२६ ला दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी मंगळवारी (ता. १७ ) नोव्हेंबरला रात्री उशिरा रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवळीवाडा, धनजीनाका उतार येथे सुशील मांडवकर यांच्या घराच्या वासे शिडीवर उभे राहून बदलाचे काम सुरू होते. त्यावेळी संशयित अरबाज अन्वर मेमन (वय २८, रा. केबल गल्ली, समीर अपार्टमेंटजवळ, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील मालवाहू गाडी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने गाडीची शिडीला धडक दिली. या अपघातात शिडीवर उभे असलेले सुरेश पंडित यांच्या खुब्याला फ्रॅक्चर झाले असून, त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश बागुल यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित अरबाज मेमन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.