Wednesday, November 18, 2026
spot_img
Home खेड लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत चक्कर आलेल्या कामगाराचा मृत्यू

लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत चक्कर आलेल्या कामगाराचा मृत्यू

खेड:- कंपनीत काम करीत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळलेल्या ३३ वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कृष्णकुमार शांताराम वर्मा (वय ३३, रा. पिरलोटे, ता. खेड) असे मृत कामगाराचे नाव आहे. चिपळूण येथील एस.एम.एस. रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास कृष्णकुमार वर्मा हे कंपनीत काम करीत होते. कामादरम्यान तहान लागल्याने ते पाणी पिण्यासाठी गेले होते. पाणी पिऊन पुन्हा कामावर परतल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले.

ही बाब लक्षात येताच लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने चिपळूण येथील एस.एम.एस. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ००/२०२६ अन्वये करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कागदपत्रे खेड पोलिस ठाण्यात प्राप्त झाल्याने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी आकस्मिक मृत्यू क्रमांक ९५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. कामावर असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे