विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याचा प्रकार उघड ; ग्रामीण पोलिसांची कारवाई
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील कुवांरबाव- कांचन हॉटेल, आरटी ओनाका परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल आणि अपघाताचा धोका वाढेल अशा पद्धतीने विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणाऱ्या चार चालकांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आहेत.
अजय मनाई भाई (वय ६०, रा. गणेश कॉलनी टीआरपी, रत्नागिरी), चिंतन भरण पटेल (वय २४, रा. टिआरपी, रत्नागिरी), अब्बास बादशहा पठाण (वय ५९, रा. पानवल, जुगाईनगर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहे. या घटना रविवारी (ता. १५) सायंकाळी कांचन हॉटेल ते आरटीओ नाका येथे वेगवेगळ्या वेळेत घडल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास संशयित अजय भाई हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी कुवांरबाव येथील महामार्गावरून विरुद्ध दिशेने चालवत होते. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास संशयित चिंतन पटेल हे विरुद्ध दिशेने चालवत असल्याचे निदर्शनास आले. महामार्गावरील इतर वाहनांना त्यामुळे अडथळा व अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यानंतर सायंकाळी पानवल, जुगाईनगर येथील संशयित अब्बास पठाण हे कांचन हॉटेल ते आरटीओ नाका दरम्यान महामार्गावर विरुद्ध दिशेने चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रविण पाटील व बाजिराव कदम यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तीनही स्वारांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









