Monday, October 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर आढळलेल्या दोघांचा मृत्यू

रत्नागिरीत बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर आढळलेल्या दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुर्ली-फाटा येथील पिकअप शेडजवळ व रेल्वेस्टेशन ते कुवारबाव रस्त्यावर फुटपाथवर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या दोघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

राजू भैरु कुरयाल (वय ५०, रा. कर्नाटक सध्या. रा. संजीवनी नगर गोळप, रत्नागिरी) व संदिप प्रकाश यादव (वय ३५, रा. चापोली ता. संगमेश्वर) अशी मृत प्रौढांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. २४) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू कुरयाल हा कुर्ली फाटा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळला तर संदीप यादव हे रेल्वस्टेशन ते कुवारबाव जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.