रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकूल व शिवाजीनगर येथील सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्यपान करणाऱ्या दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास बारक्या बेदर (वय ४१, रा. मुळ डोगरीपाडा, वडवली, ता. तलासरी, जि. पालघर, सध्या ओंकार मोरे यांच्या बोटीवर, मिरकरवाडा, रत्नागिरी) व महेश रमेश कदम (वय ३०, रा. मैत्री पार्क सी-७ शिवाजीनगर, रत्नागिरी) अशी मद्यपान करणाऱ्या दोघांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. २२) सात ते साडेआठच्या सुमारास प्रमोद महिजान क्रिडा संकुल येथे बंद टपरीच्या आडोशाला तर आयटीआय नाचणे लिंक रोड येथील मंगळवार बाजार येथे गाडीच्या आडोशाला निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस शिपाई प्रमोद यादव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारवरुन पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









